बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर भाजप नेते पाशा पटेल आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे दिसल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. स्थानिक राजकारणात पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचे संबंध चांगले नसल्याचं बोललं जायचं. मात्र दोघे एका व्यासपीठावर दिसल्याने पंकजा मुंडे यांनी बेरजेचं राजकारण सुरु केलं आहे का, अशी चर्चा आता रंगली आहे.
परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीप हंगामाची सुरुवात पंकजा मुंडे, विनायक मेटे आणि पाशा पटेल यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हे नेते एकत्र आले.
पाशा पटेल आणि विनायक मेटे हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे नेते होते. मात्र स्थानिक राजकारणात विनायक मेटे यांच्याशी पंकजा मुंडेंचं जमत नसल्याचं बोललं जायचं. शिवाय पाशा पटेल यांच्या बाबतीतही हिच परिस्थिती होती. पण वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला या दोघांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं.
दरम्यान ज्या ग्रामपंचायतींनी माझा सन्मान वाढवला त्यांना विकासाच्या रथावर बसवेन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. शिवाय बीड जिल्ह्यातील इतर सहकारी साखर कारखान्यांपेक्षा जास्त हमीभाव देऊ, असं आश्वासनही पंकजा मुंडेंनी दिलं.
धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वात बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी होता, पण व्यासपीठावर सगळे चोर होते, असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीकास्त्र सोडलं.
विनायक मेटे आणि पाशा पटेल पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Oct 2017 09:50 PM (IST)
परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीप हंगामाची सुरुवात पंकजा मुंडे, विनायक मेटे आणि पाशा पटेल यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -