मुंबई : ऑक्टोबर हीटनंतर महाराष्ट्रात थंडीची चाहुल लागली आहे. हळूहळू अनेक शहरांमध्ये गारवा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज परभणीत राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. परभणीत पारा 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. यंदाच्या मोसमातलं हे सर्वात कमी तापमान आहे.
तर नाशिकमध्येही कडाक्याची थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये आज सकाळी तापमान 12 अंश सेल्सिअस राहिलं. येत्या काळात तापमान आणखी खाली येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
यंदा अलनिनोचा प्रभाव असल्यानं थंडी कमी असेल असं भाकीत हवामान संस्थांनी वर्तवलं आहे. मात्र त्याचा प्रभाव नाशिक, परभणीमध्ये जाणवाताना दिसत नाही.