काही ठिकाणी हादऱ्याने घड्याळं, भांडी, कपाटं खाली पडली तर खिडक्या, दरवाज्यांचा देखील झटक्याने आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. गूढ आवाज होऊन जोरदार झटका बसल्याने भूकंप झाल्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले. या गूढ आवाजाने नागरिकांच्या मनात घर केले आहे.
याआधी 3 नोव्हेंबर रोजी गूढ आवाजाने हा परिसर हादरला होता. त्यानंतर रविवारी संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी गूढ आवाज होऊन जमिनीला हादरे बसल्याने दहा दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहे. मात्र हा भूकंप होता की, आणखी स्फोटाचा आवाज होता याचे कारण कळू शकले नाही.
दीड महिन्यापूर्वीही अशाच प्रकारे गूढ आवाज येऊन जमिनीत कंपन झाले होते. त्यानंतर शनिवारी 3 नोव्हेंबर रोजी दोन झटके बसले होते. त्यानंतर आज पुन्हा गूढ आवाज येऊन जमिलीला हादरे बसले. दीड महिन्यात ही तिसरी घटना घडल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.