परभणी : व्हॉट्सअॅप आणि तत्सम माध्यमातून अफवा, चुकीचे मेसेज, लोकांच्या भावना दुखावणाऱ्या पोस्टवर परभणी पोलिसांची नजर राहणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना अधीक्षक कार्यालयाकडून आदेश देण्यात आले आहेत.
यासाठी परिसरात चालणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनची बैठक घेऊन, सोशल मीडियाचा चुकीचा वापर होऊ नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देशात मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियातून अनेक प्रकारच्या पोस्ट फिरत आहेत. यातून अनेक वेळा धार्मिक भावना दुखावणं, एखाद्याची नाहक बदनामी होणे, समाजात तेढ निर्माण होते. यातून समाजस्वास्थ्य बिघडत असल्याने परभणी पोलिसांनी हे सावधगिरीने पाऊल उचललं आहे.
व्हॉट्सअॅपवर सतत अॅक्टिव्ह असणारे आणि आपापले ग्रुप चालवणाऱ्या अशा अॅडमिनच्या बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे मेसेज शेअर करताना विशेष काळजी कशी घ्यावी, कोणते मेसेज टाकू नये, यावर बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
परभणी पोलिसांच्या या पावलामुळे, सोशल मीडियाचा अनिर्बंध वापर करणाऱ्या तरुण पीढीला याचे फायदे आणि तोटे लक्षात येणार आहेत. त्याद्वारे समाजात पसरणारे चुकीचे मेसेज काही प्रमाणात कमी होतील, अशी अपेक्षा आहे.
परभणी पोलिस व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसोबत बैठक घेणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Apr 2018 03:15 PM (IST)
यासाठी परिसरात चालणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनची बैठक घेऊन, सोशल मीडियाचा चुकीचा वापर होऊ नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -