Parbhani News : परभणी शहराचा प्रचंड विस्तार झाला मात्र शहरातील रस्ते मात्र अद्याप ही तसेच आहेत. मुख्य रस्ते असो वा छोटे मोठे रस्ते असो हे रस्ते अरुंद राहिलेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण या रस्त्यांवर झालेले आणि यामुळेच दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण शहरांमध्ये वाढत आहे. याच अनुषंगाने परभणीतील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेली मागणी जवळपास मान्य झाल्याने परभणीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परभणीतील कुठल्याही रस्त्यावर जा एक तर खड्डे नाही तर अतिक्रमण हे त्यामुळे सामान्य नागरिकांना चालणेही मुश्किल झालेले आहे. मागच्या आठवडा भरात शहरातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातात 2 शिक्षक, एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक असल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कार्यकारी परिषद सदस्य प्रवीण देशमुख यांनी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शहरातील खानापूर फाटा ते असोला पाटी व विसावा कॉर्नर ते पुढे चार किलोमीटर रस्ता रुंदीकरण आणि पथदिव्यांसह दुभाजक असावेत अशी मागणी केली होती.
त्याची गडकरी यांनी तात्काळ दखल घेत शहरातील खानापूर फाटा ते असोला पाटी 6 किलोमीटर व विसावा कॉर्नर ते ESSAR PUMP ४ किलोमीटर रस्ता रुंदीकरण आणी पथदिव्यांसह दुभाजक चालू आर्थिक वर्षाच्या Annul plan मध्ये मान्यता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या अनुषंगाने गडकरी यांचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता, प्रादेशिक अधिकारी,कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले असून लवकरच याबाबत निर्णय होऊन काम सुरू केले जाणार आहे..
सामान्य माणसाची दखल नितीन गडकरीच घेऊ शकतात- देशमुख
परभणी सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याची दखल हे केंद्रीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच घेऊ शकतात आणि अशा प्रकारे कामांना न्याय देऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून समस्त परभणीकरांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया प्रवीण देशमुख यांनी दिली आहे.