परभणी : परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचा मुख्याध्यापक शाळेतच मद्यपान करताना पालकांनी रंगेहात पकडल्याने विद्यार्थी व पालकात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परभणीच्या गंगाखेडमधील खोकलेवाडीतील संतप्त पालकांनी शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेची माहिती पुराव्यासहीत शिक्षण विभागाला पालकांनी देऊन मुख्याध्यापकाची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे.
मुख्याध्यापकाची तात्काळ बदलण्याची मागणी
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शाळेच्या खोलीतच मद्यपान करताना पालकांनी रंगेहाथ पकडले. या घटनेची माहिती पुराव्यासहीत शिक्षण विभागाला पालकांनी देऊन मुख्याध्यापकाची तात्काळ बदलण्याची मागणी केली. मुख्याध्यापक मागील काही दिवसांपासून दारू पित असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. शनिवारी सकाळी पालकांनी अचानक शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक मद्यासहीत शाळेच्या खोलीत आढळून आल्याने पालकांनी मुख्याध्यापकाला जाब विचारला. मात्र मुख्याध्यापकांनी यावर मौन बाळगले. मुख्याध्यापकांनी शाळेत केलेल्या गैरवर्तनाचे पुरावे असूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने याबद्दल विद्यार्थी व पालकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
विद्यार्थी व पालकांतून तीव्र संताप व्यक्त
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील लोखंडी गेट, घसरगुंडी, बाकडे विक्री केल्याचा तसेच वर्गातील फॅन, बोर्ड काढून नेल्याचे विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितले. मुख्याध्यापकांनी शाळेत केलेल्या गैरवर्तनाचे पुरावे असूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने याबद्दल विद्यार्थी व पालकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .
गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देऊन केली पाहणी
गावातील नागरिकांनी सदरील मुख्याध्यापकाची तक्रार शिक्षण विभागाकडे केल्यामुळे गंगाखेडचे गटशिक्षण अधिकारी यांनी खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच गावकऱ्यांचे संवाद साधला आहे. त्यामुळं या मुख्याध्यापकावर काय कारवाई होणार? हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव बिराजदार असल्याची माहिती देखील मिळत आहे.
दरम्यान, पालकांनी अचानक शाळेला भेट दिल्याने हे प्रकरण उघडकीस आले. पालकांना मुख्याध्यापक मद्यासहीत शाळेच्या खोलीत आढळून आल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर पालकांनी मुख्याध्यापकाला याबाबत जाब देखील विचारला. मात्र मुख्याध्यापकांनी यावर मौन बाळगले. मुख्याध्यापकांनी शाळेत केलेल्या गैरवर्तनाचे पुरावे देखील पालकांनी शिक्षण विभागाकडे दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या: