सारिका झुटे असं मृत तरुणीचं नाव असून ती बारावीत शिकत होती.
सारिकांच्या वडिलावंर शेतीसाठी कर्ज होतं. शिवाय पाऊस नसल्यामुळे पीकही वाळत जात होतं. त्यामुळे उत्पन्नाचं कोणतंही साधन शिल्लक नव्हतं. कर्जाच्या टेन्शनमुळे वडील आत्महत्या करतील, अशी भीती सारिकाच्या मनात होती. त्यामुळे त्याआधीच तिने आपलं आयुष्य संपवलं.
दरम्यान, सारिकाच्या आत्महत्येच्या अगदी सहा दिवस आधी तिचे काका चंडिकादास झुटे यांनी आत्महत्या केली होती. याचा उल्लेख सारिकाने सुसाईड नोटमध्येही केला आहे.
सारिकाच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की,
प्रिय पप्पा,
आपल्या भाऊंनी पाच सहा दिवसापूर्वी शेतातील सर्व पीक जळू गेल्यामुळे शेतात जाऊन आत्महत्या केली. तसेच आपल्या घरावर कर्जाचा बोजा, त्यात पाऊस पडत नसल्याने तुम्ही कर्ज काढून केलेली पेरणी सर्व जळून गेल्यामुळे तुमचे हाल व घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचे गेल्यावर्षी लग्न झाले, तेच कर्ज अजून फिटले नाही आणि तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम्ही पण आपल्या भाऊंसारखी घटना करु नयेत, यामुळे मी माझे जीवन संपवते.
तुमची सारिका
सारिकाची सुसाईड नोट