परभणी : परभणीचे शिवसेना आमदार चोर आणि गद्दार असल्याचा आरोप परभणीच्या भाजप जिल्हाध्यक्षाने केला आहे. जी कामं आमदारांनी केली नाहीत, त्याच श्रेय घेत असल्याचा आरोपही जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर वरिष्ठ पातळीवर शिवसेना-भाजप मधील खदखद पुढे येत असताना परभणीच्या भाजप जिल्हाध्यक्षाने शिवसेना आमदार डॉ राहुल पाटील यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन चोर आणि गद्दार असल्याचा आरोप केल्याने स्थानिक पातळीवरील धुसफूस देखील उघड झाली आहे.
परभणी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरोसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन परभणी विधानसभेचे आमदार डॉ राहुल पाटील यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय स्वतःच्या नावाने सर्वत्र घेत असल्याचे सांगितले.
शिवाय लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उभा असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे हे आमदार चोर आणि गद्दार असल्याचा गंभीर आरोप आनंद भरोसे यांनी केला आहे.
शिवाय लोकसभा निवडणुकीत परभणी विधानसभेतून शिवसेना 30 हजारांनी मागे असल्याने ही जागा भाजपला सोडवून घेण्याची मागणी देखील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे करणार असल्याचे भरोसे यांनी सांगितले आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत जरी शिवसेना-भाजप युतीत लढले असले तरीही यांच्यातील मतभेद मात्र अद्याप कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. आता भरोसे यांच्या आरोपांवर आमदार राहुल पाटील काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबणीवर का पडत आहे?
परभणीचे शिवसेना आमदार चोर आणि गद्दार, भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jun 2019 05:24 PM (IST)
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उभा असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे हे आमदार चोर आणि गद्दार असल्याचा गंभीर आरोप आनंद भरोसे यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -