पुणे/कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज तीन वर्षे पूर्ण झाली. कॉम्रेड पानसरेंचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडावे, यासाठी पुणे, कोल्हापूरसह राज्यभरात शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्यात आली.
मारेकऱ्यांना शोधण्यात तपास यंत्रणांना यश आलं नाही. या हत्या प्रकरणातील दोन संशयितांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे तपास यंत्रणा नेमकं काय करतात, असा सवाल केला जातो आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येला तीन वर्षे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 54 महिने पूर्ण झाली. तरीही या दोन विचारवंतांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. त्या विरोधात आज पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर निषेध करण्यात आला. याच ठिकाणी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती. नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, 93 वर्षांच्या सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई रानडे यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोल्हापुरात उमा पानसरे यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी आज मॉर्निंग वॉक करुन पानसरेंच्या हत्येचा निषेध केला. त्याचबरोबर तपास यंत्रणा नेमक्या काय करत आहेत, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. यावेळी भाजप सरकारवरही कडाडून टीका केली.
नुकतेच उच्च न्यायालयाने दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा छडा न लागल्यानं तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली होती. जोपर्यंत मारेकऱ्यांना शोधात नाही, तोपर्यंत लढा सुरुच ठेवणार असल्याचं उमा पानसरे यांनी म्हटलं.
कॉ. पानसरेंच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण, मारेकरी अद्याप मोकाटच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Feb 2018 02:57 PM (IST)
नुकतेच उच्च न्यायालयाने दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा छडा न लागल्यानं तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली होती. जोपर्यंत मारेकऱ्यांना शोधात नाही, तोपर्यंत लढा सुरुच ठेवणार असल्याचं उमा पानसरे यांनी म्हटलं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -