औरंगाबाद : नोकरीचं आमिष दाखवून विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी 6 लाख रुपये घेतल्याचा आरोप देवराव चव्हाण नावाच्या तरुणाने केला आहे. औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक आणि धनादेश अनादर प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयात कारकुनाची नोकरी लावण्यासाठी मंझा यांनी देवरावकडून 6 लाख रुपये घेतले होते. मात्र तरुणाला नोकरी लागली नाही. नोकरी लावण्यासाठी घेतलेले पैसे तरुणाने परत मागितले असता त्यांनी दोन वेळा धनादेश दिले. मात्र तेही वटले नाहीत.
शेवटी तरुणाने छावणी पोलीस स्टेशनमध्ये उपकुलसचिवांविरोधात तक्रार दाखल केली. चिकलठाण येथील देवराव चव्हाण यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे.
नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, विद्यापीठाच्या उपकुलसचिवांविरोधात गुन्हा
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
20 Feb 2018 12:14 PM (IST)
नोकरीचं आमिष दाखवून विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी 6 लाख रुपये घेतल्याचा आरोप देवराव चव्हाण नावाच्या तरुणाने केला आहे. औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -