कुठल्याही कार्यक्रमात लोकांशी, कार्यकर्त्यांशी या सेल्फीच्या नादामुळे साधा संवादही होत नाही, असं पंकजा म्हणाल्या. त्या आज पिंपरी चिंचवडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या जयंती कार्यक्रमात बोलत होत्या.
कुठेही गेलो की लोक कायम सेल्फी आणि कॅमेऱ्यातच गुरफटलेले असतात. त्यामुळे तरुणाईला जरा शिस्तीची वेसण लावणं गरजेचं आहे, असं म्हणत पंकजांनी सेल्फीवाल्यांचे कान उपटलेत.
याशिवाय राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनी भाजपचा रस्ता धरल्याने पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीमुक्त होणार, यात शंका नसल्याचंही पंकजा म्हणाल्या.
पाहा व्हिडिओ :