बीडः विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ बँक निवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांन्या जनसेवा पॅनलने धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ लोकसेवा विकास पॅनलचा दारुण पराभव केला आहे.


 

 

धनंजय मुंडे यांनी पॅनलला मतदान केलेल्या सर्व सभासदांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. मात्र धनंजय मुंडे यांना बालेकिल्ल्यात हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

'भाजपला 50 वर्षांनंतर सत्ता मिळाली ते विसरु नये'

लोकशाही पद्धतीत निवडणुका या लढवाव्याच लागतात आणि त्यात जय पराजय या गोष्टी चालतच असतात. विरोधी पक्ष म्हणून आम्ही ते आमचे कर्तव्य पार पाडले. पराभव स्वीकारला आहे. मागील काळात बँकेत झालेल्या गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि घोटाळ्याची माहिती या निमित्ताने आम्हाला सभासदांसमोर मांडण्याची संधी मिळाली, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं

 

 

विरोधी पक्षाचे जे काम असते ते आम्ही प्रामाणिकपणे केले. सुमारे सात हजार सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेऊन मतदान केले, ही बाब ही उल्लेखनीय आहे. उमेदवार निवडीपासुन ते मतदानापर्यंतच्या अतिशय अल्प कालावधीत जिल्ह्यातील आणि बँक कार्यक्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन चुरशीने निवडणुक लढविल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत.

 

पराभवामुळे कार्यकर्त्यांनी खचुन न जाता पुन्हा जोमाने कामाला लागावे, असे आवाहन करतानाच या पुढील काळातही बँकेच्या कारभारावर लक्ष्‍ा ठेऊन चुकीच्या गोष्टींना लोकशाहीच्या मार्गाने विरोध कायम ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या देशात पन्नास वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला केंद्रात आणि राज्यात निवडणुका जिंकता आल्या होत्या, त्यामुळे याचं भान विजयी झालेल्यांनी ठेवावं, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावला आहे.

 

संबंधित बातम्याः


वैद्यनाथ बँक निवडणूक, तिसऱ्या फेरीनंतरही पंकजा मुंडेंचं पॅनल आघाडीवर