महिला पोलिसाची अरेरावी, भावाला ओरडल्याने दुकानदाराला मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2016 11:50 AM (IST)
नागपूर : नागपूरमध्ये एका महिला पोलिस कॉन्स्टेबलची दादागिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका शूज स्टोअरच्या मॅनेजरला पोलिस कॉन्स्टेबल कविता यादवने मारहाण केली. कविता यादवचा भाऊ पवन हा मोंटिना शूज स्टोअरमध्ये सेल्समन म्हणून काम करतो. मात्र दुकानाचा मॅनेजर जयेंद्र गोगादे याने तिच्या भावाला काम व्यवस्थित का करत नाहीस, असा जाब विचारला. पण मॅनेजर भावाला ओरडल्याचा राग आल्याने कविताने भरदिवसा दुकानात जाऊन त्याला मारहाण केली. कविताने जयेंद्रला थोबाडीत मारलं. इतकंच नाही तर त्याला दुकानातून ओढत पोलिस स्टेशनला नेण्याचा प्रयत्न केला. दुकानाच्या मॅनेजरने घडलेल्या प्रकाराबद्दल सीताबर्डी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.