बीड : परळीत झालेला पराभव स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंशी पंकजा मुंडेंची टक्कर होती.
काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंनी सरशी करत परळी नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला होता. त्यामुळे पंकजांनी पराभव स्विकारत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
सगळं काही करुनही जनतेने असा कौल का दिला, त्याचं विश्लेषण आत्ता करता येणार नाही. मात्र पराभव स्वीकारुन मी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचं पंकजा मुंडेंनी जाहीर केलं आहे.