पंकजा मुंडेंचा परळी तालुक्यात 'गाव तिथे विकास' दौरा
एबीपी माझा वेब टीम | 02 Apr 2018 06:42 PM (IST)
पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यात ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला आजपासून सुरुवात केली. गावोगावी जाऊन पंकजा मुंडे जनतेशी संवाद साधत आहेत.
बीड : जिल्हा परिषद निवडणुकीत परळी तालुक्यातून भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतः मतदारांनीच हा वचपा काढला, असं मत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यात ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला आजपासून सुरुवात केली. या दौऱ्याला खोडवा सावरगाव येथून प्रारंभ झाला. गावोगावी जाऊन पंकजा मुंडे जनतेशी संवाद साधत आहेत. परळीत भावना आणि विश्वासाच्या जोरावरच निवडणूक लढवता येऊ शकते, असं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे नेहेमीच सांगायचे. दारू, पैसा आणि गुंडागर्दीच्या जोरावर निवडणुका जिंकणं अशक्य आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसमोर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचं आव्हान आहे. त्यातच आता शिवसेनेनेही परळीतून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने यावेळची निवडणूक आणखी चुरशीची होईल, यात काही शंका नाही. त्यापूर्वी पंकजा मुंडेंनी गावोगावचा दौरा सुरु केला आहे. संबंधित बातम्या :