सावरगाव (बीड) : तोडपाण्याची कामं आम्ही करत नाही, असे म्हणत ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. बीडमधील सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी उपस्थित जनतेशी संवाद साधला.
यावेळी पंकजा मुंडे यांनी सावरगावच्या गडाचं नावही जाहीर केलं. "भगवानगड जसा भगवानबाबांची कर्मभूमी, तशी सावरगाव भगवानबाबांची जन्मभूमी आहे. म्हणजेच त्यांच्या भक्तीचा गड आहे. म्हणून या गडाचं नाव 'भगवानभक्ती गड'." अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली.
धनंजय मुंडेंना टोला
"तोडपाण्याची कामं आम्ही करत नाही. सत्तेत असो वा विरोधात, आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचं काम केलं.", असा टोला धनंजय मुंडेंना लगावत, त्या पुढे म्हणाल्या, "यांनी हौद तरी बांधला काय? फर्लांगभर रस्ता तरी बांधला का?"
ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ
"उद्याचा दिवस मावळायच्या आत 'ऊसतोड कामगार महामंडळ' स्थापन करुन, त्याची घोषणा करणार आहोत. ऊसतोड कामगारांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर करुन घेतला आहे.", अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातून दिली. तसेच, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता खाली ठेवण्यासाठी मी संघर्ष करेन. प्रसंगी ऊसतोड कामगारांसाठी रानात कोयता घेऊन जाण्यासही तयार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
"गुप्त सर्व्हे झाले म्हणता, त्यामध्ये प्रितम मुंडे धोक्यात असल्याचं सांगितलं जातं. पण तुमचा सर्व्हे तुमच्या समोर आहे. 2019 मध्ये इथे विजयाचीच घंटा वाजेल." असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला. तसेच, सर्व्हे बघून कोणी तिकीट देत नाही, माणसं बघून तिकीट देतात, असेही त्या म्हणाल्या.
"मला कोणत्याही पदाची लालसा नाही. मुंडेसाहेब किंगमेकर होते, त्याच जागी जनतेने मला बसवलं आहे. जनतेच्या हिताचं सरकार आणणं माझं कर्तव्य आहे, कुठल्या पदावर बसणं हे कर्तव्य नाही", असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- जनतेच्या हिताचं सरकार आणणं माझं कर्तव्य आहे, कुठल्या पदावर बसणं हे कर्तव्य नाही - पंकजा मुंडे
- मला कोणत्याही पदाची लालसा नाही, मुंडेसाहेब किंगमेकर होते, त्याच जागी जनतेने मला बसवलं आहे - पंकजा मुंडे
- मुलगी झाल्यावर वर्षाच्या आत भगवान गडावर येऊन तिला भक्तीचा धागा बांधा - पंकजा मुंडे
- माझ्या कारखान्याच्या शेतकऱ्यांना FRP साठी पैसे नव्हते, तेव्हा माझ्या आईने स्वत:ची जमीन गहाण ठेवून पैसे दिले : पंकजा मुंडे
- गुप्त सर्व्हे झाले म्हणता, त्यामध्ये प्रितम मुंडे धोक्यात असल्याचं सांगितलं जातं, पण तुमचा सर्व्हे तुमच्या समोर आहे. 2019 मध्ये इथे विजयाचीच घंटा वाजेल : पंकजा मुंडे
- सर्व्हे बघून कोणी तिकीट देत नाही, माणसं बघून तिकीट देतात : पंकजा मुंडे
- ग्रारामविकास मंत्री म्हणून काम करताना विकासाची गंगा तुमच्या पायापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन - पंकजा मुंडे
- तुमच्यामुळे मी मंत्री आहे, मंत्री म्हणून काम करताना विकासाची गंगा तुमच्या पायापर्यंत आणेन : पंकजा मुंडे
- ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता खाली ठेवण्यासाठी पंकजा मुंडे संघर्ष करत आहे - पंकजा मुंडे
- तुमच्या हातातील कोयते खाली ठेवण्यासाठी पंकजा मुंडे काम करेल : पंकजा मुंडे
- उद्याचा दिवस मावळायच्या आत 'ऊसतोड कामगार मंडळ' जाहीर झाल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहे - पंकजा मुंडे
- ऊसतोड कामगारांसाठी रानात कोयता घेऊन जाण्यासही तयार - पंकजा मुंडे
- सावरगावचा गड म्हणजे भगवानभक्ती गड : पंकजा मुंडे
- मी वाघीण तर आहेच, वाघाच्या पोटी वाघीणच जन्मते - पंकजा मुंडे
आम्ही तोडपाणी करत नाही, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Oct 2018 04:00 PM (IST)
"मला कोणत्याही पदाची लालसा नाही. मुंडेसाहेब किंगमेकर होते, त्याच जागी जनतेने मला बसवलं आहे. जनतेच्या हिताचं सरकार आणणं माझं कर्तव्य आहे, कुठल्या पदावर बसणं हे कर्तव्य नाही"
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -