मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली आहे. दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळ विस्तार होईल असं मुख्यमंत्र्यांनी काल सोलापुरात जाहीर केलं. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. एकनाथ खडसे यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ते मंत्रिमंडळ विस्तारानंतर समजेल असं सांगितलं.


पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याच्या आरोपावरुन दोन वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांना एसीबीने दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे.

त्यामुळे आता एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीत आहे. मात्र एकनाथ खडसे यांचं पुनर्वसन हे भाजप प्रदेशाध्यक्षपद देऊन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.  दिवाळीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार, खडसे येणार का? मुख्यमंत्री म्हणतात...

सध्या रावसाहेब दानवे हे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. त्यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ येत्या जानेवारी महिन्यात संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर दानवेंच्या जागी एकनाथ खडसेंची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे हे पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते. इथे त्यांची चर्चा पक्षाचे सचिव राम लाल यांच्यासोबत झाली. यामध्ये खडसेंचं पुनर्वसन कसं करायचं याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी खडसेंना प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या पर्यायावरही विचारमंथन झालं.

खडसे हे लेवा पाटील समाजातून येतात. लेवा पाटील समाजाचा मोठा भाग ओबीसीमध्ये आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये पक्षवाढीसाठी खडसेंचा फायदा होऊ शकतो, अशी भाजपची धारणा आहे.

खडसेंच्या नावाची कॅबिनेट मंत्रीपदासाठीही चर्चा झाली, मात्र त्यांना नेमकं कोणतं खातं द्यायचं यावरुन तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे खडसेंना प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपण पक्षाचा एक निष्ठावान सैनिक आहे, जी जबाबदारी मिळेल, ती सांभाळेन असं म्हटलं आहे.

मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही: एकनाथ खडसे 

दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही, असं यापूर्वीच सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली होती. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याच्या आरोपावरुन दोन वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांना एसीबीने दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे.

संबंधित बातम्या 

दिवाळीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार, खडसे येणार का? मुख्यमंत्री म्हणतात...

मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही: एकनाथ खडसे  

बाजारात तुरी... मंत्रिमंडळ विस्ताराच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेत वाद  

विस्तारात अनेकांना सुखद धक्का; शिंदेंचं प्रमोशन, जानकरांची स्वप्नपूर्ती  

राज्यातल्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या घडामोडींना वेग, मुख्यमंत्री आणि दानवे अमित शाहांच्या भेटीला  

10 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, खडसेंचं कमबॅक गुलदस्त्यात