वाळू माफियांची मुजोरी, इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ल्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2016 08:08 AM (IST)
पुणे : इंदापूर वाळू माफियांची मुजोरी वाढतच आहे. वाळू वाहतूकदाराने चक्क तहसीलदार वर्षा लांडगे यांच्यावर हल्ला केला. अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत असताना ही घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात वर्षा लांडगे-खत्री थोडक्यात बचावल्या. पुणे-सोलापूर रोडवर इंदापूरमध्ये आज पहाटे अनधिकृत वाळ वाहतूकदारांवर कारवाई सुरु होती. यावेळी वाळू वाहतूकदार करणाऱ्या ट्रक मालकाने त्याची गाडी तहसीलदारांच्या गाडीसमोर लावून त्यांना जीवे मारहण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालकाला अटक केली असून चौकशी केली सुरु आहे.