बीड :  माझ्यासाठी ऑनलाईन दसरा मेळाव्यात बोलणे हे मोठे आव्हान आहे. दसरा मेळाव्यात दर वर्षी मागच्या वर्षी पेक्षा जास्त गर्दी व्हायची या वर्षी मात्र कॅमेरा समोर बोलावे लागेल. ऊसतोड कामगार हा या मेळाव्याचा प्राण आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.


ऊसतोड कामगारांच्या बाबतीत निश्चित या मेळाव्यात ऐकायला मिळेल.  ऊसतोड कामगारांचं नेतृत्व हे गरीब कष्टकऱ्यांच नेतृत्व आहे. ऊसतोड कामगारांसाठी कुणीही काम केले तरी त्यांचं स्वागतच आहे. पण त्यांचा हेतू राजकारण करण्याचा नसावा. प्रकाश आंबेडकरांचा हेतू चांगलाच आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.


त्या म्हणाल्या की, मी ऊसतोड कामगारांना मी आवाहन करतेय. यावेळी जे जे भूमिका व्यक्त करतायेत त्यांचं मी स्वागतच करते.मी कारखानदार नाहीच, ऊसतोड कामगाराचे  हित बघणारी आहे. त्यांनी म्हटलं की मी कोयता देते तुम्हाला पण तुमचा विश्वास तोडणार नाही.


मेळाव्याला जात असताना रस्त्यात फटाके फोडून पंकजा मुंडेंच्या ताफ्याचे स्वागत करण्यात आले.  गोपीनाथ गडावरुन सावरगावला जाताना पंकजा मुंडे यांचं रस्त्यामध्ये ठिकाणी स्वागत होत आहे.  तेलगाव चौकामध्ये ऊसतोड कामगारांना हाती कोयता देऊन पंकजा मुंडे यांनी तुमचा विश्वास तोडणार नसल्याचे सांगितले आहे.


पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने
पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने सावरगावच्या भगवान भक्ती गडावर होणार आहे. भगवानगडावर दसऱ्या दिवशी राजकीय संदेश देण्याची परंपरा होती. मात्र, भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्या सोबत वाद झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दोन वर्षांपासून भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगावमध्ये भगवान भक्तिगड उभा केला आहे. याच ठिकाणी दसऱ्या दिवशी पंकजा मुंडे भगवान बाबाचे दर्शन घेऊन याच ठिकाणी त्या दसरा मेळावा घेत असतात. यावर्षी हा दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला न येता घरी राहून भगवान बाबांची पूजा करून हा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केला आहे. तर पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा ठेवला आहे.