देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. आज शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर स्मारक सभागृहात, तर संघाचा विजयादशमी उत्सव हडगेवार सभागृहात होणार


 

  1. बीडमध्ये पंकजा मुंडेंचा भगवान भक्ती गडावर तर भगवान गडाच्या पायथ्याशी प्रकाश आंबेडकरांचा मेळावा


 

  1. दसऱ्यानिमित्त विठुरायाची राऊळी सजली, झेंडुच्या पानाफुलांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट


 

  1. तब्बल सात महिन्यानंतर राज्यात आजपासून जीम सुरु, दसऱ्यानिमित्त राज्य सरकारकडून जीम मालकांना दिलासा


 

  1. मंदिरं खुली करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक, मुंबईत मंदिर उघडण्याचा प्रयत्न तर नागपुरात महाआरती


 

  1. मराठा आरक्षणाची स्थगिती हटवली नाही तर 28 ऑक्टोबरला तीव्र आंदोलन, मराठा ठोक क्रांती मोर्चाचा इशारा तर उदयनराजेंनी राजीनामा देऊन नेतृत्व करण्याची मागणी


 

  1. पूरपरिस्थीती, कोरोना, तांत्रिक अडचणींमुळे अतिम वर्षाची परीक्षा देता न आलेल्यांना 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा देता येणार, कुलगुरुंसोबतच्या बैठकीत निर्णय


 

  1. बिहारमध्ये भाजपची सत्ता येण्याचा एबीपी माझा सी वोटर्स सर्वेचा अंदाज,; मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमारांना पसंती


 

  1. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून 31 डिसेंबरपर्यंत


 

  1. रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा हैदराबादवर 12 धावांनी विजय; पंजाबच्या गोलंदाजांपुढे हैदराबादच्या गोलंदाजांची हाराकिरी