पंकजा मुंडे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2016 10:55 AM (IST)
अहमदनगरः ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं जलसंधारण खातं काढल्यानं अहमदनगरला मुंडे समर्थकांनी रोष व्यक्त केला आहे. पाथर्डीत मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे. पाथर्डीच्या मुख्य चौकात पुतळा जाळून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचाही यामध्ये समावेश होता. जलयुक्त शिवार योजनेचं श्रेय मिळू न देण्यासाठी पद काढल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.