परभणी: पंकजा मुंडे यांनी गृहखात्यासंदर्भातल्या वक्तव्यावरुन घुमजाव केलं आहे. माजलगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गृह खाते हे आपले आवडते खाते असून गृह खात्यावर लक्षं असतं असं वक्तव्य केलं होतं.


परंतु आपण असं कोणतंही विधान केलं नसल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी त्या वक्तव्याबाबत घुमजाव केलं. काल (सोमवार) महापालिका निवडणुक प्रचारासाठी परभणीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी याबाबत सांगितलं. मी असं कोणतं विधान केलं नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'मी तसं काहीही वक्तव्य केलं नाही, तुम्ही टेप तपासून पाहा.' असं म्हणत त्यांनी पत्रकारांना टाळणंच पसंत केले आणि कार्यक्रम त्या स्थळावरून निघून गेल्या. परभणी महानगरपालिकेचा निवडणूक 19 एप्रिल रोजी होणार असून सोमवार (17 एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी भाजप उमेदवारांसाठी ही प्रचारसभा घेतली होती.

बीडमध्ये काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते, तेव्हापासून मला गृहखात्याचे प्रचंड आकर्षण आहे. गृहखात्यात काम करण्याची संधी मिळाली नसली, तरी त्या खात्यावर माझं लक्ष असतं. कारण मंत्रिमंडळातील ते सर्वात आवडतं खातं आहे’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

माजलगावमधील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस निवासस्थानाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.

संबंधित बातम्या:

मंत्रिमंडळातील गृह खातं माझं आवडतं खातं : पंकजा मुंडे