अहमदनगर : आमदार बच्चू कडू यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. हेमा मालिनी यांच्यानंतर सचिन तेंडुलकरवरविषयी बोलताना बच्चू बडू यांची जीभ घसरली.

अहमदनगरमध्ये आसूड यात्रेत शेतकऱ्यांची व्यथा सांगताना, बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरचा उल्लेख कबुतर असा केला आहे. सचिनचे रन मोजणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत. मात्र शेतात अयुष्यभर ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांचे रन मोजायला कोणीच नसल्याचं ते म्हणाले.

हेमामालिनी रोज बंपर दारु पितात, त्यांनी आत्महत्या केली का? : बच्चू कडू


बच्चू कडू म्हणाले की, "सचिन तेंडुलकरचे रन नका मोजू, ते कबुतर मेलं काय, राहिलं काय. नको काढू रन साल्या, आपलं काय वाट्याने चाललंय इथे. एवढं डोक्यावर घेतलंय, असं वाटतंय पाकिस्तान जिंकून आलंय. पाहिलं तर इथून छक्का आणि तिथून चौका, ते काय कोणालाही मारता येतं."

यापूर्वी बच्चू कडू यांनी दारुमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, हा दावा खोडून काढताना हेमा मालिनी यांचं उदाहरण दिलं होतं. हेमा मालिनी रोज एक बंपर दारु पितात, म्हणून त्यांनी काय आत्महत्या केली का?,” असं बच्चू कडू नांदेडमध्ये म्हणाले होते.

पाहा व्हिडीओ