पंढरपूर : विठुरायाच्या गळ्यात रोज येणाऱ्या हजारो हारांमुळे तयार होणाऱ्या निर्माल्यावर आता मंदिर समितीने तोडगा काढला असून देवाच्या गळ्यातील हार आता थेट भाविकांच्या गळ्यात घालण्यास सुरुवात झाल्याने भाविकांतुन समाधान व्यक्त होत आहे . विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातून रोज हजारो भाविक दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येत असतात .
हे भाविक देवाला अर्पण करण्यासाठी तुळशी आणि फुलांचे हार घेऊन येत असतात . या हारांमुळे रोज किमान 500 किलोचे निर्माल्य तयार होत होते . यात्रा काळात हे निर्माल्य हजारो टनात तयार होत असल्याने कचरा ही मंदिर प्रशासनासाठी डोकेदुखी बनू लागली होती. यावर मार्ग काढण्यासाठी मंदिर प्रशासनाने आता हे देवाच्या गळ्यातील हार भाविकांच्या गळ्यात घालण्यास सुरुवात केली आहे . मंदिर समितीचे प्रांताधिकारी विठ्ठल जोशी यांनी हा निर्णय घेतल्यानंतर आता दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाला देवाच्या गळ्यातील हार प्रसाद म्हणून मिळू लागला आहे.
यापूर्वी फक्त बडे भाविक आणि व्हीआयपी मंडळींना हे हार घातले जात होते मात्र या निर्णयानंतर सर्वसामान्य भाविकांतून समाधान व्यक्त होत असून मंदिराच्या निर्माल्याचा प्रश्न देखील आता सुटला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी रोज हजारो तुळशी, झेंडूच्या फुलांचे हार अर्पण होतात. दर महिन्याला 500 टनाच्या आसपास हातांचा ढिग जमा होतो. जमा केलेले हार मंदिर समितीचे कर्मचारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने घेऊन यमाईचे तलाव येथील गोशाळे जवळ विल्हेवाट लावावी लागत होती. यासाठी मंदिर समितीला विशिष्ट यंत्रणा राबवावी लागत होती. आता हा प्रश्न निकाली निघाल्याने हा ओला कचरा तयार होणेही बंद होणार आहे.
विठुरायाच्या चरणावरील हार आता भाविकांच्या गळ्यात, मंदिर समितीने निर्माल्यावर काढला तोडगा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Dec 2019 08:34 PM (IST)
हारांमुळे रोज किमान 500 किलोचे निर्माल्य तयार होत होते . यात्रा काळात हे निर्माल्य हजारो टनात तयार होत असल्याने कचरा ही मंदिर प्रशासनासाठी डोकेदुखी बनू लागली होती. यावर मार्ग काढण्यासाठी मंदिर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -