पंढरीत विठ्ठलभक्ताला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्याचं निलंबन
एबीपी माझा वेब टीम | 20 May 2017 04:47 PM (IST)
पंढरपूर : पंढरीतल्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात भक्ताला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशोक भंडगे असं मारकुट्या पुजाऱ्याचं नाव असून तीन दिवसांपूर्वी विठ्ठलाच्या मूर्तीला हार घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भक्ताला त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता. 'एबीपी माझा'नं या मारहाणीला वाचा फोडल्यानंतर मंदिर समितीनं त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचं आश्वासन दिलं आहे. पुढील आदेश येईपर्यंत अशोक भंडगे निलंबित राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.