पालघर : पालघर तालुक्यातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन मुलींच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, दोन्ही मुलींचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मुलींच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या दोन्ही मुलींचे कोरोना चाचणीचे अहवाल नकारात्मक असल्याची पुष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यामुळे या लहान मुलींबद्दल होत असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीलाही याची लागण झाली होती. परिणामी या मुलींना कोरोनाची लागण झाली असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगत होत्या.


आईवडिलांना कोरोनाचे संक्रमण झाल्याने मुलींनाही कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चा गावात होत्या. यामुळे त्यांच्या भवितव्याबद्दलही अनेक प्रश्न निर्माण केले जात होते. अशा स्थितीत या दोन्ही मुलींचे तपासणी अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्या सुरक्षित झाल्या आहेत. मृत पावलेली कोरोना बाधित व्यक्ती उपचारासाठी परिसरातील अनेक आरोग्य संस्थांमधून फिरत होती. यादरम्यान त्यांच्या कुटुंबीयांसोबत तसेच नातेवाईकांसोबत थेट संपर्कात आल्यामुळे त्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाली असल्याची भीती व्यक्त होत होती. यातच पितृछत्र हरवलेल्या या दोन्ही मुलींनाही कोरोनाची लागण झाल्याची दाट शक्यता वडिलांच्या संपर्कात आल्यामुळे वर्तवली जात होती. लींसह या सर्वांचे स्वाबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते.


धक्कादायक! होम क्वॉरंटाईन व्यक्तीला शिवभोजन केंद्र चालविण्याची परवानगी


नातेवाईकांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह


या मुली ज्या नातेवाईकांकडे राहात होत्या तिथेही भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, या जुळ्या मुलींचे तपासणी नमुने नकारात्मक आल्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे व उपस्थित होणाऱ्या सर्व प्रश्नांवर पडदा पडला आहे. आता या दोन्ही मुलींचे तपासणी अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्या दोन्ही सुखरूप व सुरक्षित आहेत. मात्र, त्यांची आई कोरोनाबधित असल्याने त्यांच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती स्थिर असचे समजते.


नऊ मिनिट लाईट बंद केल्यास राज्य अंधारात जाण्याचा धोका : उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत


राज्यातील कोरोनाचा आकडा वाढला


राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आत्ताच्या घडीला राज्यात 490 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. काल गुरुवारी एकाच दिवसात 81 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार मेहनत घेत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळण्यास प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तरीही अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.


Lockdown Help | निफाडच्या व्यापाऱ्याने मुंबईतील पोलिसांसह आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 3 हजार किलो द्राक्षं पाठवली