पालघरमध्ये तांबाडी नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवलं
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 02 Jul 2017 12:54 PM (IST)
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या तांबाडी नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. अंकुश पवार असं या 35 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या तरुणाला बाहेर काढण्यासाठी विक्रमगडचे रहिवासी आटोकाट प्रयत्न करत होते. रविवारी सकाळपासून पालघर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तांबाडी नदीला पूर आला. त्याच पाण्यात अंकुश अडकला होता. पालघरमध्ये रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे विक्रमगड तालुक्यातील 20 गावांचा संपर्क तुटला आहे. तर पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड तालुक्यातले नदी-नाले तुडुंब भरुन वाहत आहेत.