पालघर : चिंचणी बीच संध्याकाळच्या वेळेस गर्दीने भरलेला असतो. आजही प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने बीचवर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळेस काळ्या रंगाची भरधाव कार त्या गर्दीत घुसल्याने नऊ पर्यटक जखमी झाले असून त्यात हेतूने खातू या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिली आहे.
डहाणू तालुक्यातील चिंचणी बीचवर भरधाव कारने दहा जणांना उडवले असून यात हेतून खातू (६८) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. चिंचणी बीच संध्याकाळच्या वेळेस गर्दीने भरलेला असतो आजही प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने बीचवर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळेस काळ्या रंगाची भरधाव कार त्या गर्दीत घुसल्याने नऊ पर्यटक जखमी झाले असून त्यात हेतून खातू या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिली आहे.
खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ असणाऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्यांचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. यावरून कारचा वेग किती असेल हे समजत आहे. इतर नऊ पर्यटकांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. 68 वर्षाच्या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे. कार मध्ये असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक कोळी यांनी सांगितले. या बीचवर दररोज कार व मोटरसायकलस्वार नेहमी वेगाने गाडी चालवत असतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची मागणी बऱ्याच वर्षापासून चिंचणीकर करत आहेत. मात्र अशा भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आता तरी अशांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.
ज्यावेळेस चिंचणी बीचवर अपघात घडला आणि अपघातग्रस्तांना चिंचणी च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यावेळेस येथील शासकीय रुग्णवाहिकेचे चालकच उपस्थित नसल्याने प्रकृती गंभीर असलेल्यांना बोईसर येथे पुढील उपचारासाठी हलवायचे होते. अशा वेळेस पत्रकार प्रवीण बाबरे यांनी स्वतः रुग्णवाहिकेचा ताबा घेऊन जखमींना बोईसर येथील सिटी हॉस्पिटल मध्ये हलवले. त्यानंतर मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह त्याच रुग्णवाहिकेतून चिंचणी येथील आरोग्य केंद्रात आणला. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.