पालघर : पालघर मधील बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना मंगळवारी ठाणे असतिरिक्त सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी चार आरोपींची 15 हजारांच्या जामिनावर अटींसह मुक्तता केली. या आरोपींवर कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना कारागृहात ठेवण्यात आले होते. अटक आरोपींपैकी चार आरोपींनी जामिनासाठी विशेष सेशन न्यायालयात जमीन अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. तेव्हा चौघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. तर याच प्रकरणातील तब्बल 100 हून अधिक आरोपींच्या जामिनावर 26 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती उपलब्ध आहे.


मंगळवारी ठाणे विशेष सेशन न्यायालयात पालघर हत्याकांड प्रकरणातील कारागृहात बंदिस्त आरोपी नितीन लक्ष्मण जाधव, मनोज लक्ष्मण जाधव, लक्ष्मण रामजी जाधव आणि तुकाराम रुपाजी साठे यांनी अतिरिक्त ठाणे सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात जामीन अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी सुनावणी करण्यात आली. या सर्व आरोपींच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सादर आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात अली. न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी चारही आरोपीना सिंगल पीआर बॉण्ड आणि 15 हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला. आता येत्या 26 नोव्हेंबर रोजी याच प्रकरणातील तब्बल 100 पेक्षा अधिक आरोपींच्या जमीन अर्जावर सुनावणी होणार असलायची माहिती आहे.


काय आहे प्रकरण?


कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्‍या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 110 हल्लेखोरांना ताब्यात घेतलं होतं. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आलं होतं. पालघर पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. या प्रकारात अजूनपर्यंत 110 ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न आणि इतर कलमे लावण्यात आली आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :


पालघर हत्याकांड प्रकरण : डहाणू न्यायालयात 126 आरोपीं विरोधात आरोपपत्र दाखल