पालघर : सोनी टीव्हीवरील पोरस, महाकाली, शनिदेव या मालिकांच्या सेटला भीषण लागली. आगीत वृदांवन स्टुडिओ जळून खाक झाला आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळच्या उंबरगावमधल्या देहरी इथे ही आग लागली.

या आगीत जीवितहानी झाली नसली तरी स्टुडिओचं मोठं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु स्टुडिओमध्ये पीओपी आणि प्लास्टिकचं मोठ काम असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

वृंदावन स्टुडिओत पोरस, महाकाली, शनिदेव आणि छोट्या-मोठ्या धार्मिक मालिकांचं चित्रीकरण होतं.