पालघर : जिल्हा परिषद शाळा कर्दळ, केंद्र सफाळे येथील इयत्ता 7 वीच्या वर्गातील विशाल दिवे आणि हर्षद राजापकर या कर्दळ, डोंगरी पाड्यावर राहणाऱ्या मध्यम वर्गीय दोन अवलिया विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या काळात अनेक छोटे छोटे यशस्वी विज्ञान प्रयोग केले. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मिळून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंपासून एक दर्जेदार ब्ल्यूटूथ डिजे स्पीकर बनविला. शाळेतील शिक्षकांना आणि शाळेत येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यास या डिजेचा प्रयोग दाखविताना त्यांच्या चेहऱ्यावर आपण शोध लावल्याचे स्मितहास्य बघण्यास मिळाले. तसेच हा प्रयोग पाहताना सर्वजण चकितच झाले.
शाळेतील बंद पडलेल्या स्पिकरची देखील केली दुरुस्ती
हर्षद आणि विशाल यांनी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने शाळेतील 4 वर्षांपासून बंद असलेले स्पिकरला वायरिंग करत ते स्पिकरही चालू केले आणि ब्लूटूथला जोडले. त्यामुळे ब्लूटूथ चालू झाला. केंद्रप्रमुख कुंदा संखे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक केले.
असा तयार केला ब्ल्यूटूथ डीजे स्पीकर
खराब आणि टाकाऊ असलेल्या ब्ल्यूटूथचे डीवाईस घेतले. स्पिकरच्या गोलाकार भागाचा उपयोग यासाठी केला. कंपास गोलचा वापर केला. घरातील सुरीचाही वापर केला. शाळेतील शिक्षक आणि मित्रांनी यासाठी मदत केली. साहित्य मिळाल्यावर दोन दिवसांत तयार केले. असंच डिवाईस बनवून शाळेला देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मोबाईल मधल्या बऱ्याच गोष्टी, कविता या माध्यमातून मुलांना शिकवता येणार आहेत. अँड्रॉईड मोबाईल उपलब्ध झाल्यास युट्यूबच्या साहाय्याने नवनवीन शोध लावण्याच्या प्रतिक्षेत राहतील. त्यासाठी परिसरातील दानशूर व्यक्तिमत्त्वांनी सहकार्य केल्यास या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतच होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :