Palghar Crime :  आमचा ख्रिश्चन धर्म (Christian Missionary ) स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल असे सांगून पैसे देण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा डाव डहाणू येथील स्थानिक ग्रामस्थांनी उधळून लावला.  डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे काल दुपारी घरात एकटी असलेल्या वयस्कर आदिवासी महिलेला पैशांचे आमिष दाखवत जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्विकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या चार मिशनरींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. 

Continues below advertisement

दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यात धर्मांतरणाची समस्या 

पालघर जिल्ह्यातील डहाणू , तलासरी ,जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यात धर्मांतरणाची समस्या खूप जुनी आहे. या भागातील गरीब आशिक्षित आदिवासींना त्यांच्या आशिक्षितपणाचा फायदा घेत तसेच विविध आमिषे दाखवत धर्मांतरण केले जात आहे. यामुळे गावोगावी मूळ हिंदू आदिवासी आणि धर्मातरण केलेले ख्रिश्चन आदिवासी यांच्यात सण-उत्सव आणि इतर प्रथा साजर्‍या करण्यावरून वारंवार वाद निर्माण होण्याचे प्रकार घडत आहेत.

Continues below advertisement

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याची तक्रार

शुक्रवारी दुपारी डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे चार ख्रिश्चन मिशनरींनी एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून तुम्ही आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बरे होईल. त्याच बरोबर पैसे देण्याचे आमिष दाखवत तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करू नका, आमच्या धर्माचे पालन करा असे सांगून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याची तक्रार या महिलेने डहाणू पोलिसांत केली आहे.  

मिशनरींना फैलावर घेत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार

गावात ख्रिश्चन धर्मप्रसारक आल्याचे कळताच स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले. त्यांनी मिशनरींना फैलावर घेत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. महिलेच्या तक्रारीवरून डहाणू पोलिसांनी क्लेमेंट डी . बैला, मरीयामा टी . फिलीप्स, परमजीत उर्फ पिंकी शर्मा कौर आणि परशुराम धर्मा धिंगाडा या चार मिशनरींना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून अटक केली आहे.