पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार नाल्यात कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे. तर गाडीतील दोघं जण गंभीर जखमी आहेत. नाल्यात पडल्यावर ही कार जवळपास 500 मीटर वाहून गेली.
मुंबई-अहमदाबाद हायवेवर मेंढवण खिंडीत हा अपघात झाला. कार नाल्यात कोसळल्यानंतर वाहून गेल्याने 51 वर्षीय सेहबाज इम्तियाज शेख या महिलेचा मृत्यू झाला, तर दोघं गंभीर आहेत. अपघात झाला त्यावेळी गाडीत चौघं जण होते. सर्व जण गुजरातमधील भिलाडचे रहिवासी आहेत
मंगळवारी मुसळधार पाऊस सुरु असताना रात्री ही कार गुजरातहून मुंबईला जात होती. त्यावेळी वळण घेताना कारवरील नियंत्रण सुटलं आणि कठडे नसल्याने ती नाल्यात पडली. हा अपघात घडला तिथे घातक वळण असून 15 दिवसांपूर्वी याच नाल्यात दोन कार कोसळल्या होत्या.