उस्मानाबाद : तुळजापुरातील नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सलगरा येथील आई व तिच्या ३ मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सलगरा येथील शेतकरी मधुकरराव देवराव चव्हाण यांची पत्नी छाया मधुकर चव्हाण (40), मोठी मुलगी कु. शितल मधुकर चव्हाण (19), पल्लवी मधुकर चव्हाण (16) आणि कु. आश्विनी मधुकर चव्हाण (15) या चौघींनी आज त्यांच्या स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही मात्र या घटनेने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.
एकाच कुटुंबातील चौघींनी आत्महत्या केल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेषत: मधुकर चव्हाण यांच्या या तिन्ही मुली सुशिक्षित व उच्चशिक्षित होत्या.
मोठी मुलगी बी. ए. तृतीय वर्षात, दुसरी मुलगी बारावी व तिसरी मुलगी अकरावीमध्ये नळदुर्ग येथे शिक्षण घेत होत्या. मधुकर चव्हाण यांचा मुलगा सुनील मधुकर चव्हाण (12) हा कोल्हापूर येथे शिक्षणासाठी असतो. घटना घडली तेव्हा तो कोल्हापूर येथे होता.
एकाच कुटुंबातील चौघींनी जीवनयात्रा संपवल्याने सलगरा गावावर शोककळा पसरली आहे. सदर घटना घडताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चारही मृतदेह बाहेर काढले. पंचनामा आणि शवविच्छेदन ही प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
उस्मानाबादमध्ये तीन मुलींसह आईची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Sep 2017 10:49 PM (IST)
एकाच कुटुंबातील चौघींनी आत्महत्या केल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेषत: मधुकर चव्हाण यांच्या या तिन्ही मुली सुशिक्षित व उच्चशिक्षित होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -