मुंबई-अहमदाबाद हायवेवर कंटेनर-टेम्पोचा अपघात, दोघांचा मृत्यू
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 15 Feb 2018 11:14 AM (IST)
अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमध्ये कंटेनर आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की टेम्पोचा चक्काचूर झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंचपाडा भागात हा अपघात झाला. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि तो विरुद्ध बाजूकडून येणाऱ्या टेम्पोवर धडकला. ही धडक इतकी जबरदस्त होती, ही टेम्पोचा पार चेंदामेंदा झाला. अपघातात दोघांना जागीच प्राण गमवावे लागले. अपघातानंतर कंटेनरमधील सामानही रस्त्यावर विखुरलं. अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे अंदाजे 5 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सध्या वाहतूकीची कोंडी पूर्ववत करण्यात आली आहे.