Pahalgam terrorist attack : महाराष्ट्रात राहणाऱ्या काश्मीरी विद्यार्थी आणि नोकरदारांनी आज जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आपण काश्मीरपासून घरापासून जरी दूर महाराष्ट्रात राहत असलो तरी महाराष्ट्र आपलं दुसरं घर आहे. महाराष्ट्रात सुरक्षित असल्याची भावना त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्रातील त्यासोबतच देशातील लोकांनी सध्या परिस्थितीत कश्मीरी लोकांना जी काश्मीरच्या बाहेर राहत आहेत त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि भावाप्रमाणे वागवलं पाहिजे, अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील लोक हे आमचे भाऊ आहेत
आजच्या स्थितीत सुद्धा आमची घर ही महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी खुली आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्रातील लोक हे आमचे भाऊ आहेत. द्वेषाची भावना पसरवण्यापेक्षा देशातील कश्मीरींना प्रेमाने वागवा, अशी विनंती सुद्धा या विद्यार्थ्यांनी केली. महाराष्ट्रात आम्ही सुरक्षित त्यामुळं कश्मीरी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारचे प्रशासनाचे आभार मानले. आम्हाला समजून घ्या आम्ही तुमचे भाऊ आणि महाराष्ट्रातील लोक आमचे भाऊ, काश्मीर बाहेर राहणाऱ्या कश्मीरी विद्यार्थ्यांची देशवासियांना विनंती केली आहे.
महाराष्ट्रातील पर्यटकांना आजही हॉटेल्स बंद असतील तर आमची घर उघडी
महाराष्ट्रातील पर्यटकांना आजही हॉटेल्स बंद असतील तर आमची घर उघडी आहेत तुम्ही आमच्या घरी या. द्वेषाची भावना न बाळगता प्रेमाने वागवा असे कश्मीरी विद्यार्थी म्हणाले. दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आमच्या राज्यावर हा धब्बा लागला आमच्या पर्यटनावर त्याचा परिणाम झाला आहे. आमचे घरचे सुद्धा घाबरले आहेत. आम्ही दूर राहतो म्हणून ते आम्हाला कॉल करतात व्हिडिओ कॉल करतात. आम्ही त्यांच्या डोळ्यापासून दूर आहोत त्याच्यामुळे ते थोडे घाबरतात पण महाराष्ट्रात कुठे काय आम्हाला प्रॉब्लेम आलेला नाही असे काश्मीरी विद्यार्थी म्हणाले.
काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात एक होस्टेल बनवा
जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र उपमुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं काही अडचण आली तर आम्ही तुमच्या संपर्कात राहू असे विद्यार्थी म्हणाले. कश्मीरी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात एक होस्टेल बनवा अशी मागणी आम्ही केली आहे. शिवाय टाटामध्ये जे कॅन्सरसाठी पेशंट आले आहेत त्यांच्यासाठी आणि कुटुंबासाठी एक हॉस्टेलची सोय करावी. नफरत की माहोल को प्यार में बदलना चाहिए अशी आम्ही मागणी केल्याचे विद्यार्थी म्हणाले.
दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही जणांचा मृत्यू झाला आहे, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, आम्हालाही दुःख झाल्याचे विद्यार्थी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे सरकार असेल त्यांचे सगळ्यांचे आम्ही आभार मानत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांनी आम्हाला खूप प्रेम दिल्याचे विद्यार्थी म्हणाले.
आम्ही कुठलाही धर्म बघितला नाही, पर्यटकांना पूर्णपणे सहकार्य केलं
पर्यटनाच्या दृष्टीकोनातून अजूनही काश्मीरमध्ये यायचं असेल तर त्यांनी तो प्लान करावा काश्मीरमधील लोकांना सुद्धा महाराष्ट्रातील लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. जर टूरिस्ट स्पॉट बंद असतील किंवा हॉटेल्स नसतील तर आमच्या घरी तुम्ही राहा आम्ही तुमचे स्वागत करु आमचे घर तुमच्यासाठी खुले असतील असे विद्यार्थी म्हणाले. महाराष्ट्रातील लोक हे आमचे भाऊ आहेत. आम्ही कुठलाही धर्म बघितला नाही आणि पर्यटकांना पूर्णपणे सहकार्य केल्याचे विद्यार्थी म्हणाले. आम्ही माणुसकीचा धर्म पाळला आहे असे म्हणाले.
पर्यटकांवर झालेला हल्ला हा पर्यटकांवरचाच नाही तर आमच्या भावावर झालेला हल्ला
आमचा धर्म जरी वेगळा असेल तरी आपण सगळे हिंदुस्तानी आहोत सगळ्यांच एकच रक्त आहे. पर्यटकांवर झालेला हल्ला हा पर्यटकांवरचाच नाही तर आमच्या भावावर झालेला हल्ला आहे असे विद्यार्थी म्हणाले. आमचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही सुद्धा तुमचे भाऊ आहोत तुम्ही सुद्धा आमचे भाऊ आहात असे विद्यार्थी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
भारत-पाक सीमेवर हालचालींना वेग, सरकार घेणार मोठा निर्णय? शेतकऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना