Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेचा दाह प्रचंड वाढला आहे. कमाल तापमानाची आच धगधगत असून नागरिक वाढत्या तापमानामुळे हैराण झाले आहेत. महाराष्ट्रात येत्या चार दिवसात विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.  एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढत असताना राज्यभर आज प्रचंड उकाडा वाढलाय. मराठवाड्यात अनेक भागात ढगाळ वातावरण होते. विदर्भात काही जिल्ह्यांना पावसाचा हायअलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात महाराष्ट्रात कसे हवामान असेल? जाणून घेऊया.. (IMD Forecast)

हवामान विभागाचा अंदाज काय?

महाराष्ट्र कर्नाटक मध्यप्रदेश सह 24 राज्यांमध्ये आता वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आसाम बिहार तसेच पश्चिम बंगालच्या भागात चक्रकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रविवारपासून (27 एप्रिल) विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा यलो देण्यात आलाय. तर नांदेड, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सोलापूर, सांगली ,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपणार आहे.

मराठवाड्यात हवामानाचा काय अंदाज?

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 22 व 26 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 23 एप्रिल रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव व लातूर जिल्हयात तर दिनांक 24 एप्रिल रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, जालना व लातूर जिल्हयात तर दिनांक 25 एप्रिल रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

Weather Update : महाराष्ट्र, कर्नाटकसह 24 राज्यांमध्ये वादळासह वीज कोसळण्याचा इशारा; सिक्कीममध्ये भूस्खलनात अडकलेल्या 1 हजार पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढलं, 1500 अजूनही अडकले