Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगामला पर्यटनासाठी गेलेल्या अतुल मोने यांच्यासह संजय लेले आणि हेमंत जोशी या तीन डोंबिवलीतील पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या .(Jammu And Kashmir) बुधवारी काश्मीरमधील पर्यटकांचे पार्थिव राज्य सरकारने विशेष विमानाने महाराष्ट्रात परत आणले . डोंबिवली तर मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉप मध्ये सीनियर इंजिनियर या पदावर काम करणारे अतुल मोने यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला .काश्मीरमध्ये हादरवून टाकणारी आपबीती सांगितल्यानंतर कुटुंबीयांमध्ये एकच आक्रोश होता . आता राज्य सरकारकडून अतुल मोने यांच्या जागी त्यांच्या पत्नीला रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली . (Atul Mone)

Continues below advertisement

पत्नी व मुलीला मध्य रेल्वेत रुजू करण्याची प्रक्रीया सुरु

पहलगामच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे अतुल मोने यांना ठार केले. मध्य रेल्वेत सिनियर इंजिनियर पदावर कार्यरत असणाऱ्या अतुल मोने यांच्या जागी त्यांच्या पत्नीला मध्य रेल्वेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉप मध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर या पदावर काम करत होते. 2000 मध्ये ते ज्युनियर इंजिनियर पदावर मध्य रेल्वेत रुजू झाले होते.कामावर अतिशय मनमिळावू आणि सर्वांना सामावून घेत काम करणाऱ्या अतुल मोने यांचा दहशतवादी हल्ल्यात 22 तारखेला मृत्यू झाला.त्यामुळे त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या बायकोला, अनुष्का मोने यांना मध्य रेल्वेत नोकरी दिली जाणार आहे. ग्रुप C मध्ये ही नोकरी असेल. त्यांचे एम ए पर्यंत शिक्षण झालेले असल्याची माहिती आहे. त्यानुसार त्यांना विभाग दिला जाणार आहे. त्याचसोबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून देखील आर्थिक मदत जाहीर होण्याची शक्यता  असल्याची माहिती मध्य रेल्वे सूत्रांनी दिलीय.

Continues below advertisement

डोळ्यासमोर घडला गोळीबाराचा थरार

त्या दिवशी वातावरण खूप छान होतं. सगळेजण फोटोज काढत होते, एन्जॉय करत होते. आम्ही परत निघत होतो, इतक्यात अचानक गोळीबार सुरू झाला. मला काहीच समजत नव्हतं. लोक पळत होते, झोपत होते, मीही खाली झोपले, असं अतूल मोने यांच्या मुलीनं सांगितलं.सुरुवातीला गोळीबार दूरवरून होत होता. पण हळूहळू ते जवळ आले आणि थेट लोकांवर गोळ्या झाडू लागले. आम्ही जिथे थांबलो होतो, तिथे त्यांनी विचारलं 'हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? माझ्या संजय काकांनी हात वर केला. त्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी घातली. मी त्यांच्या मागेच होते. मी हे सगळं पाहिलं.हेमंत काका धावले, विचारायला गेले की काय चाललंय, पण त्यांनाही गोळी लागली. नंतर माझे बाबा विनवणी करत होते – 'गोळी मारू नका, आम्ही काही केलं नाही.' पण त्यांनी ऐकलं नाही. आई बाबांना कव्हर करायला गेली, पण त्यांनी बाबांच्या पोटात गोळी घातली. अशी आपबीती अतुल मोने यांच्या मुलीने सांगितली आहे.