पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या निष्पापांच्या मृत्यूमुळे पुणे शहरावर शोककळा पसरली आहे. सुट्टीची मजा घ्यायला आणि फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे धक्क्यात आहेत. पहलगाममध्ये मंगळवारी (दि.23) झालेल्या हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. दरम्यान आज दोन्ही मित्रांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हल्ल्यावेळी अंगावर जे कपडे होते, त्यावरती रक्ताचे शिंतोडे पडले होते, त्याच कपड्यांनी आसावरीकडून वडिलांना अग्नी दिला आहे. संतोष जगदाळेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेजण फार जवळचे लहानपणापासूनचे मित्र होते. मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. दोघांचेही पार्थिव त्यांच्या पुण्यातील घरी आणण्यात आले. पुण्यामध्ये त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. संतोष जगदाळे यांची हत्या त्यांची मुलगी आणि पत्नीच्या डोळ्यासमोर करण्यात आली. आसावरीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपल्यामुळे संतोष जगदाळे यांच्या मुलीला मोठा धक्का बसला.
संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी केली होती. संतोष जगदाळे यांच्या मित्रांना देखील अश्रू अनावर झाले आहेत. सकाळपासूनच संतोष जगदाळे यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आज सकाळी शरद पवार यांच्यासमोर संतोष जगदाळेंची पत्नी आणि मुलीने टाहो फोडला. यावेळी आसावरी जगदाळे हीने या हल्ल्याचा थरार शरद पवारांना सांगितला. आसावरी जगदाळेची अवस्था पाहून उपस्थित नागरिकांना देखील अश्रू अनावर झाले. फॅमिलीसोबत सुट्टी इन्जॉय करण्यासाठी गेलेल्या संतोष जगदाळेंची कुटुंबीयांसोबतची ही सहल अखेरची ठरली. हल्ल्यावेळी अंगावर जे कपडे होते, त्यावरती रक्ताचे शिंतोडे पडले होते, त्याच कपड्यांनी आसावरीकडून वडिलांना अग्नी दिला आहे. संतोष जगदाळेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
आसावरीसोबत तिचे वडील संतोष जगदाळे, आई प्रगती जगदाळे, त्याचसोबत काका कौस्तुभ गनबोटे आणि त्यांची पत्नी संगीता गणबोटे हे काश्मिरमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. यामधील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. जगदाळे कुटुंबीय पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहतात. तर गणबोटे कुटुंबीय हे पुण्यातील रास्ता पेठेत राहतात. वडील आणि काकांना गमावल्यामुळे आसावरीसोबत त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.
महाराष्ट्रातील मृतांची नावे
1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल