नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पद्म पुरस्कार (Padma Awards 2024 Winners) जाहीर केले असून एकूण 110 जणांचा गौरव करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडेंना (Uday Deshpande) पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. एकूण पाच जणांचा पद्मविभूषण तर 17 जणांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 


उदय देशपांडेंना पद्मश्री पुरस्कार


मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. उदय देशपांडे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत 50 देशातील 5 हजारहून अधिक लोकांना मल्लाखांबाचं प्रशिक्षण दिलं आहे. 


महाराष्ट्रातील पद्मश्रीचे मानकरी



  • उदय देशपांडे 

  • मनोहर डोळे

  • झहिर काझी

  • चंद्रशेखर मेश्राम

  • कल्पना मोरपारिया

  • शंकरबाबा पापलकर


 






पद्मश्री विजेत्या चामी मुर्मू यांनी गेल्या 28 वर्षांत 28 हजार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे. चामी मुर्मू यांना या आधी नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांना हा सन्मान दिला.


जशपूर, छत्तीसगड येथील आदिवासी कल्याण कार्यकर्ता जागेश्वर यादव यांना सामाजिक कार्य क्षेत्रात पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी आपले जीवन उपेक्षित बिरहोर पहारी कोरवा लोकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले.


 






देशातील सर्वोच्च नागरी सन्मान


देशात पद्म पुरस्कारांची सुरूवात 1954 साली करण्यात आली. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा /कार्यक्षेत्रात हे पुरस्कार दिले जातात. 'पद्मविभूषण' हा पुरस्कार  उल्लेखनीय आणि अतुलनीय सेवेसाठी दिला जातो.  उच्च श्रेणीतील अतुलनीय  सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील अतुलनीय  सेवेसाठी ‘पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाते.


ही बातमी वाचा: