नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा धडकी भरावणारा आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना आकडेवारीमुळे सामान्यांनासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. काल दिवसभरात जवळपास 947 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 7 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 31 हजार असून जवळपास 6 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर मृतांची संख्या 625 वर पोहचलीय. 


जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने कोविड-19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि तातडीने काही उपाययोजना करण्यासाठी काही सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत शासनाने निर्देश केले आहेत. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढील प्रमाणे विविध मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.


राज्यात आज कोरोना बाधित रुग्णसंख्येचा विस्फोट! तब्बल 27 हजार 126 रुग्णांचे निदान


सर्व सिनेमागृहे (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्‍लेक्‍सेस), मॉल्स, ही खालील प्रतिबंधास अधिन राहून 50 टक्‍के क्षमतेच्‍या अधिन राहून सुरू राहतील. यात मास्क परिधान केल्याशिवाय  कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेण्यात यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेशदिला जाणार नाही. प्रवेशद्वार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर  ठेवण्यात यावे. सर्व आस्थापनामध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे. सामाजिक अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली पाहिजे.  या आदेशाचा भंग केल्‍यास संबंधीत सिनेमागृह (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्‍लेक्‍सेस ),शॉपिंग मॉल्स,मॉल्स मधील थिएटर्स, ही कोविड-19  विषाणू  संसर्ग केंद्र सरकारने आपत्‍ती म्‍हणून अधिसुचित केले असेपर्यंत बंद राहतील. तसेच संबंधित आस्‍थापना मालक हे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्याअंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. 


400 Strains of Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे 400 स्ट्रेन! कोविड टास्क फोर्सच्या डॉ. शशांक जोशींची माहिती


तसेच कोणतेही सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय, धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणूका,संमेलने तसेच यात्रा, उत्सव,उरुस इत्यादीचे आयोजन करण्यास परवानगी असणार नाही. त्याच प्रमाणे हॉटेल्स, बार, शाळा, कॉलेज, शिकवणीवर्ग, धार्मिकस्थळे ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. एवढेच नाही तर गृह विलगीकरणात असणाऱ्या व्यक्तीच्या घराबाहेर पाटी अथवा बोर्ड लावण्यात यावा असेही सांगण्यात आलेय. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे आयोजक, जागा मालक हे आपत्ती व्यव्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील.