नागपूर : विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नोटाबंदीच्या मुद्यावरून सरकारला घेरण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत. आज दुपारी नागपूरमध्ये विरोघी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंगल्यावर विरोधकांची बैठक होणार आहे.


केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या नोटबंदीच्या मुद्यावरून राज्यात विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आज संध्य़ाकाळी सत्ताधारी आणि विरोधकांचा चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून ते 17 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार आहे. यामध्ये सरकारला घेरण्यासाठीची रणनिती ठरवण्यासाठी विरोधक एकवटणार आहेत. या बैठकीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांसह विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे उपस्थित राहतील.

अधिवेशनात मराठा आरक्षण, नोटाबंदी अशा मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.