विधानसभेत सर्व विरोधक खडसेंच्या बाजूने, भाजप आमदारांची चिडीचूप!
यादरम्यान संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी विरोधक आमदारांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा पवित्रा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला होता.
महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक मध्यरात्री विधानसभेत मंजूर
यानंतर रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी फोनवरुन राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली. सभागृहात आज सकाळी अकरा वाजता यासंदर्भात निवेदन करुस असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर विखे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं.
भरपाईच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं
बोंडअळी आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला अडचणी आलं. शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत दिली याची रक्कम जाही करा. जोपर्यंत माहिती देणार नाही तोपर्यंत सभागृहात बसून राहण्याचा इशाराही त्यांनी दिला. होता. परंतु शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत दिली हे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत सांगू शकले नाहीत. त्यामुळे अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक आमदार सभागृहातच बसून होते.