मुंबई : शेतकऱ्यांबद्दल असंसदीय भाषेत बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विरोधकांनी झोडपून काढले आहे. शिवाय, राज्यातील शेतकऱ्यांमधूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दानवे पुन्हा एकदा बरळले! राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी रडगाणं चालूच आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ते आज जालन्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही, असली गाणी बंद करा, असं दानवे म्हणाले. एवढंच नाही तर यावेळी दानवेंनी शेतकऱ्यांसंदर्भात असंसदीय भाषेचा वापरही केला. डोक्यात सत्तेची नशा गेल्याने दानवेंकडून बेताल वक्तव्य : अशोक चव्हाण दानवेंची मस्ती शेतकरीच जिरवतील : धनंजय मुंडे रावसाहेब दानवे बेजबाबदार : पृथ्वीराज चव्हाण सत्तेतून आलेला माज दानवेंच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसतो : डॉ. राजू वाघमारे दानवेंच्या वक्तव्याचा व्हिडीओ :