मुंबई : मुख्यमंत्री स्वत:ला सक्षम समजतात, तर मग विधानभवनापासून तासाभराच्या अंतरावर स्वप्नील सोनावणे या अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या कशी झाली, असा सवाल करत विरोधकांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

मुख्यमंत्री विरोधकांवरील आरोपांचे दाखले देऊन राजकीय भाषण करतात. प्रत्यक्षात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कुठलेही प्रयत्न दिसत नसल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

 

नवी मुंबईतील नेरुळच्या सेक्टर 13 मध्ये काल प्रेमप्रकरणातून 16 वर्षीय स्वप्नील सोनावणेची हत्या झाली.

 

त्याआधी मुलीच्या कुटुंबाची तक्रार करण्यासाठी स्वप्नील त्याचे वडील शहाजी नेरुळ पोलिसात गेले होते. मात्र तिथून त्यांना हाकलून देण्यात आलं. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांची माफी मागण्यासाठी गेलेल्या स्वप्नीलच्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली, ज्यात स्वप्नीलचा मृत्यू झाला.

 

संबंधित बातम्या

नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाची हत्या


स्वप्नील सोनावणे हत्येप्रकरणी अल्पवयीन तरुणीही ताब्यात