मुंबई: विना हेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने दणका दिला आहे. कारण लवकरच हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोलच मिळणार नाही.


 

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे 1 ऑगस्टपासून 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' हे फलक तुम्हाला ठिकठिकाणी दिसू शकतील. त्यामुळं विना हेल्मेट गाडी चालवणं महागात पडणार आहे.

 

ज्या मोटारसायकलस्वाराच्या डोक्यावर हेल्मेट नसेल त्याला पेट्रोल मिळणार नाही. शिवाय विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना दिले आहेत.

 

यापूर्वी  केरळमध्येही ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची घोषणा करण्यात आली आहे. या दुचाकी चालकांकडे हेल्मेट नसेल त्यांना एक ऑगस्टपासून पेट्रोल दिलं जाणार नाही, अशी घोषणा केरळ सरकारनं केली आहे. त्यापाठोपाठ आता मुंबईतही ही मोहीम राबविण्यात येत आहे.

 

मुंबई: विना हेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने दणका दिला आहे. कारण लवकरच हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोलच मिळणार नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. तसे निर्देश राज्य सरकारनं 2500 पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत.

 

त्यामुळं पुणे असो की मुंबई किंवा मग नागपूर, औरंगाबाद, ज्यांच्याकडे हेल्मेट नाही, त्यांना नवी हेल्मेट खरेदी करावी लागणार आहेत.

 

*राज्यभरात 18 राष्ट्रीय आणि 291 राज्य असे 33 हजार 700 किलोमीटरचे महामार्ग आहेत.

*महाराष्ट्रात 2013 मध्ये 61 हजार 890 अपघात झाले, ज्यात 12 हजार लोकांचा मृत्यू झाला.

*22 हजाराहून अधिक लोक गंभीर जखमी झाले, तर 18 हजार लोकांना किरकोळ दुखापती झाल्या.

*सरासरीचा विचार करता महाराष्ट्रात रस्ते अपघातात दिवसाला 4 लोकांचा जीव जातो

*देशात एका दिवसात अपघातामध्ये 400 ते 500 लोक मृत्युमुखी पडतात

*म्हणजे देशात प्रत्येक दोन ते तीन मिनिटाला रस्ते अपघातात एकाचा मृत्यू होतो

 

हे सगळे अपघात हेल्मेट न घातल्यानं होतात असं नाही. अतिवेग, मद्यपान करुन गाडी चालवणं, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आणि वजन कोंबण्यामुळंही अपघात होतात.

 

मात्र शहरांमध्ये होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा जीव जाण्याचं प्रमाण अधिक आहे. ज्याला बहुतेक वेळी हेल्मेटचा वापर न करणं कारणीभूत ठरतं. त्यामुळं नव्या नियमांचा बाऊ करणं फारसं शहाणपणाचं नाही.

 

मुंबई, नागपुरात विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर हुक्की आली की पोलीस कारवाई करतात. दोन-चार दिवस लोकही डोक्यावर हेल्मेट वागवतात. नंतर पहिले पाढे पंचावन्न.. पुणेकर तर पाकिस्तानी आक्रमण झाल्याच्या जोशात रस्त्यावर उतरतात. हेल्मेट न घालणं हा जन्मसिद्ध हक्क असल्याच्या अविर्भावात आंदोलन करतात. त्यामुळं पोलीस, राजकारणी हतबल होतात.

 

आता हेल्मेट घालण्यासाठी आणखी एक नवा फंडा रावतेंनी शोधला. त्याची एक्स्पायरी डेट काय आहे हे अंमलबजावणीवर अवलंबून आहे.

यापूर्वी  केरळमध्येही ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची घोषणा करण्यात आली आहे. या दुचाकी चालकांकडे हेल्मेट नसेल त्यांना एक ऑगस्टपासून पेट्रोल दिलं जाणार नाही, अशी घोषणा केरळ सरकारनं केली आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्रातही ही मोहीम राबविण्यात येत आहे.

 

संबंधित बातम्या

केरळ: 'हेल्मेट नाही तर पेट्रोल मिळणार नाही', 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी


मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची नवी नियमावली


हेल्मेट सक्तीची पोलखोल, 'माझा'च्या कॅमेऱ्यामुळे पोलिसाकडून दंड वसूल