औरंगाबाद : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र ही तूट भरुन काढण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

 
औरंगाबादेतील या शासकीय रुग्णालयात एक टक्काही रक्तसाठा उरलेला नाही. त्यामुळे निर्माण झालेला रक्ताचा मोठा तुटवडा भरुन काढण्यासाठी पोलिस पुढे आले आहेत. औरंगाबादच्या पिशोर पोलिस ठाण्यातील कर्मच्याऱ्यांनी एकत्र येऊन लोकांच्या सहभागातून 308 बाटल्या रक्तदान केलं आहे.

 
एरवी लोकांच्या रक्षणाला धावणारे पोलिस गरजेच्या वेळी रक्ताच्या तुटवडा भरुन काढण्यासाठीही पुढे सरसावले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या या कामाचा कौतुक होत आहे.