शिर्डी : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटील भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यात काँग्रेसनं आपल्याला उमेदवारी न दिल्यास आपण आपला निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचं विधान सुजय विखे पाटलांनी केलं आहे. यामुळे सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना  जोर मिळू लागला आहे.


त्यामुळे काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. वडील काँग्रेसमध्ये असल्यामुळे आपण त्यांच्याच पक्षात असावं असा हट्ट नाही. मला माझं राजकीय नेतृत्व ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असल्याचंही सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे. निळवंडे धरणाचं काम सुरु व्हावं यासाठी सुजय विखे पाटलांनी ठिय्या आंदोलन केलं.

त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सुजय विखे पाटील नगर जिल्ह्यातून लोकसभेसाठी उत्सुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही तर सुजय विखे भाजपचं दार ठोठावणार का? याकडे सर्वांचे लागून आहे.