(Bhandara Hospital Fire) भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आग प्रकरणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज (सोमवारी) एका मोर्चाचं भंडाऱ्यात नेतृत्त्व करत आहेत. सदर रुग्णालयात निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू ओढावला होता. त्यामुळं या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपकडून उचलून धरण्यात आली आहे. याच मागणीसाठी भाजपकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं या मोर्चाकडेही राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे.


भंडारा रुग्णालयातील आग दुर्घटनेप्रकरणी अनेक दिवस उलटल्यानंतरही याबाबत कोणत्याही प्रकाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यामुळं मृत मुलांचे पालक आणि नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनानं तातडीनं चौकशीचे आदेश दिले होते. ज्यानंतर एक अहवालही सादर करण्यात आला होता. या 50 पानी अहवालामध्ये मध्ये दोन परिचारकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचं नमूद करण्यात आलं होतं.


दीपिकाच्या स्वयंपाकघरापासून ते असंख्य मीम्समध्ये पोहोचलेल्या 'या' व्यक्तीकडून आता मदतनिधी गोळा करण्यास हातभार


शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज घडना घडली त्यावेळी वर्तवण्यात आला होता. त्याचाच उल्लेक या अहवालातही करण्यात आला. तसंच रुग्णालयात कर्मचारी संख्या कमी होती ही बाबही स्पष्ट करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग लागली त्यावेळी तिथे कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे या घटनेबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवण्यात आलं आहे.



दोषींवर कारवाई होणारच; आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन 


दरम्यान, फडणवीसांनी ज्या मागणीसाठी मोर्चा काढण्याचा योजला त्याबाबतच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच एक आश्वासन दिलं होतं. दुर्घटनेत्या अहवालाचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल. ज्यानंतर अहवालाच्या निष्कर्षाच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्‍यांना शिक्षा होईलच यात शंका नाही, असं ते म्हणाले होते.