देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

Continues below advertisement

1. मुंबईतल्या आझाद मैदानावर असलेला शेतकरी मोर्चा राजभवनावर धडकणार, शरद पवारांसह महाविकास आघाडीतले अनेक नेते सहभागी होणार

2. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडवर पाकिस्तानची कावेबाज नजर, गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी जवळपास 308 ट्विटर अकाऊंट सुरु

Continues below advertisement

3. राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात आज सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा, कृषी कायदे रद्द करण्याची आणि वीज बिल माफीची मागणी

4. विजेचा ब्रेकडाऊन कशामुळे झाला हे नितीन राऊतांना खासगीत विचारा, सायबर हल्ल्याविषयी बोलताना अनिल देशमुखांचं वक्तव्य

5. भंडारा रुग्णालय आगीप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आज भाजपचा मोर्चा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

6. लग्नाच्या जेवणातून 200 जणांना विषबाधा, लातूरच्या उदगीर तालुक्यातील वाढवणा परिसरातील घटना, रुग्णांवर उपचार सुरु

7. कल्याणचा पत्रीपूल आजपासून खुला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार, कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा

8. तंत्रस्नेही समाजात साहित्याचा अभाव, साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकरांचं वास्तवावर बोट, 26-28 मार्चदरम्यान नाशिकमध्ये सारस्वतांचा मेळा

9. एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांची अनोखी सलामी, प्रजासत्ताक दिनानिमित्त मालवणच्या समुद्रात 400 फूट लांब तिरंगा साकारला

10. अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल लग्नाच्या बेडीत, अलिबागमध्ये थाटामाटात विवाहसोहळा, कोरोनामुळे मोजक्याच लोकांची उपस्थिती